पँथरची चाळिशी

July 16, 2013 8:04 PM1 commentViews: 2472

3 ऑक्टोबर 1957…ठिकाण नागपूरची दीक्षाभूमी…रिपब्लिकन पक्षाच्या स्थापनेचा दिवस….हे घडलं बाबासाहेबांच्या निधनानंतर, जवळपास दहा महिन्यांनी…एन.शिवराज, दादासाहेब गायकवाड, बी.सी.कांबळे, दादासाहेब रुपवते अशी बाबासाहेबांच्या सोबतची मंडळी यावेळी हजर होती. बाबासाहेबांच्या शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचं विसर्जन करून एन. शिवराज यांच्या अध्यक्षतेखाली हा पक्ष स्थापन झाला. या देशातल्या तमाम समाज घटकांच्या हक्कांसाठी लढण्याचं वचन यावेळी दिलं गेलं. या काळात काँग्रेसचं राजकारणावर वर्चस्व होतं. आणि संसदेत काँग्रेसनंतर संख्या होती ती शेड्युल्ड कास्ट फेडरेशनची. याच फेडरेशनचा नव्याने तयार झालेला
रिपब्लिकन पक्ष ही काँग्रेसची सगळ्यात मोठी विरोधी शक्ती होती. पण ही शक्ती फार काळ एकसंध राहू शकली नाही. अवघ्या वर्षभरातच रिपब्लिकन चळवळीत दोन गट पडले. एक होता बी.सी.कांबळे यांचा तर, दुसरा दादासाहेब गायकवाडांचा. पुढे जाऊन हाच पक्ष गटा-तटांत विखुरला गेला त्याची ही सुरूवात होती. गेली साडेतीन हजार वर्षं दलित समाजाने अन्याय अत्याचार सोसला त्यात आता थोडा सकारात्मक बदल जरी झाला असला तरी आजही ग्रामीण भागात हा वर्णभेद आ वासून उभा आहेच..आजही पँथरची गरज आहे असं अनेकांना वाटतं.

  • Rpi Raj Ghadge

    बी सी कांबळे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याचा विचारवर राहिले आणि दादासाहेब गायकवाड हे कॉग्रेस मध्ये गेले .डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बोले होते कि कॉग्रेस हे जळते घर आहे .
    जर मी कॉग्रेस मध्ये गेलो तर दगडासारखा राहील आणि तुम्ही गेलातर ढेकला सारखे पुटून जाल तरी पण दादासाहेब गायकवाड हे कॉग्रेस मध्ये आणि इथून रीपब्लीकॅन पार्टी ऑफ इंडिया याची तुठा तुट जाली तरी पण मी राज घाडगे हा पर्यंत करत आहे आणि माझा सोबत इतर जमाजातील लोकांनी एकत्र यावे आणि रीपब्लीकॅन पार्टी ऑफ इंडिया पुना संघर्ष वादी करावी आशी इच्छा बाळगतो जय भीम राज घाडगे लोहेगाव पुणे ८४५१०८५५८३

close