मेटाज कंपनीचं कंत्राट महाराष्ट्र सरकारने रद्द केलं

January 21, 2009 2:52 PM0 commentsViews: 7

21 जानेवारी मुंबईराज्य मंत्रीमंडळाची बैठक झाली. या बैठकीत सत्यमच्या मेटाज कंपनीला विज वितरण प्रणाली संदर्भातलं 500 कोटींचे कंत्राट महाराष्ट्र सरकारने रद्द केले आहे. या संदर्भात पुन्हा नव्यानं टेंडर प्रक्रिया राबवण्यात यावी असे निर्देशही महावितरण कंपनीला देण्यात आलेत.अशी माहिती मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. सीमाप्रश्न न्यायप्रविष्ट असताना सुध्दा कर्नाटक सरकार बेळगावमध्ये विधीमंडळाच अधिवेशन भरवतं. तसंच कर्नाटकातील सरकार मराठी भाषिकांवर अन्याय करतेय हे सर्वस्वी चुकीचं आहे अशी चिंता मंत्रीमंडळाच्या बैठकीत व्यक्त करण्यात आली. या प्रश्नांवर सर्वपक्षिय शिष्टमंडळ लवकरच पंतप्रधानांना भेटेल अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

close