ओबामांनी दिली पाकला तंबी

January 22, 2009 5:27 AM0 commentsViews: 2

22 जानेवारी, अमेरिकाबराक ओबामांनी अमेरिकेची सत्ता हातात घेतल्यानंतर पहिल्या दिवशीच पाकिस्तानला कडक इशारा दिला आहे. अमेरिका पाकिस्तानला मदत देईल, पण त्यासाठी पाकनं दहशतवादविरोधातल्या लढ्यात अमेरिकेला सहकार्य करायला हवं, असं ओबामांनी बजावलं आहे. ओबामांनी सूत्रं स्वीकारल्यानंतर परराष्ट्रविषयक धोरणासंदर्भात घेतलेला हा पहिलाच निर्णय आहे.अफगाणिस्तान सीमेवरच्या सुरक्षेसाठी पाकिस्तानलाच जबाबदार धरलं जाईल, असा सज्जड दमही ओबामांनी दिला आहे. ओबामांचा हा संदेश घेऊन सेंट्रल कमांड चीफ जनरल पेट्रॉस इस्लामाबादमध्ये पोहोचले आहेत. त्याचबरोबर ओबामा प्रशासनानं पाकिस्तानला देण्यात येणार्‍या बिगर लष्करी मदतीत तिप्पट वाढ करण्याची योजना बनवली आहे. ही मदत आता दीड अब्ज डॉलर होणार आहे. पाकिस्तानातल्या पायाभूत सुविधा, शाळा, दवाखाने बांधण्यासाठी ही मदत दिली जाईल.

close