अभिनेता अजय पूरकरला 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी

July 16, 2013 9:50 PM0 commentsViews: 628

16 जुलै : तू तिथं मी ,असंभव,राजा शिवछत्रपती यांसारख्या मालिकांमधून घराघरात पोहचलेला अभिनेता अजय पूरकरला अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याला सोमवारी रात्री बोरीवलीत अटक करण्यात आली होती. काल रात्री साडेआठच्या सुमारास बोरिवलीतल्या नाटकवाला गल्लीत अजय पूरकरचं रिक्षाचालकाशी भांडण झालं. हा प्रकार स्थानिक लोकांनी पोलिसांना कळवला, पोलिसांनी हस्तक्षेप करत भांडण थांबवलं. पण यानंतर पोलिसांनी अजय पूरकरच्या गाडीची तपासणी केली असता गाडीत एअरगन आणि तलवार आढळून आली. अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी अजयला तातडीनं अटक केली. आज अजय पूरकरला कोर्टासमोर हजर करण्यात आलं कोर्टाने त्याला 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

close