‘लोकांच्या उद्रेकामुळे राष्ट्रवादीचा सांगलीत पराभव’

July 16, 2013 5:54 PM0 commentsViews: 1897

16 जुलै : सातार्‍याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीलाच घरचा अहेर दिलाय. सांगलीतल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा पराभव लोकांच्या उद्रेकाचा परिणाम असल्याची टीका त्यांनी केलीय. लोकांची सहनशिलता संपली असल्याचं ते म्हणाले. आता आपल्यालाही पुढची दिशा ठरवावी लागणार असल्याचं त्यांनी सूचक विधानही केलंय.

close