मराठा आरक्षणावर राज्यसरकारच्या घोषणेची शक्यता

January 22, 2009 6:40 AM0 commentsViews: 7

22 जानेवारी, मुंबईआशिष जाधवशिवसंग्राम, छावा, संभाजी ब्रिगेडपाठोपाठ ' जिजाऊ ब्रिगेड ' ही महिलांची संघटनासुद्धा मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलीये. त्यामुळे मराठा व्होटबँक विरोधात जाईल की काय, अशी भीती सत्ताधार्‍यांना वाटू लागलीये. त्यामुळेच मराठ्यांना कशा पद्धतीनं आरक्षण देता येईल यासाठी कायदेशीर बाबी तपासण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. लवकरच लोकसभा निवडणुकांपूर्वी मराठ्यांना आरक्षण देण्याची घोषणा राज्य सरकार करू शकतं. सरकारनं मंत्रिमंडळाच्या उपसमितीमार्फत तशा हालचालीसुद्धा सुरू केल्या आहेत. मराठाआरक्षणावर राज्य सरकारनं नुकतीच एक बैठक घेतली होती. त्या बैठकीत मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले, " सीएस लॉ सेक्रेटरी आणि एजीमार्फत कायदेशीर बाबी तपासल्या जात आहेत. दोन दिवसांमध्ये पुढील कारवाईची पावलं उचलली जातील. लवकरच आम्ही आमचा निर्णय देऊ. "मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावरून असं वाटायला लागलंय की, मराठ्यांना आरक्षण देण्याची सर्व तयारी सरकारनं केली आहे. मराठ्यांना वेगळं आरक्षण द्यायचं की मराठ्यांचा कुणबी म्हणून ओबीसीत समावेश करायचा एवढाच काय तो प्रश्न आहे.

close