‘अलिबागमध्ये तटकरेंचा 1000 कोटींचा जमीन घोटाळा’

July 16, 2013 5:14 PM0 commentsViews: 656

Image img_210432_kiritsomiya_240x180.jpg16 जुलै: अलिबाग शेतकर्‍यांच्या जमिनी एसईझेडला विकून जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्या कुटुंबीयांनी हजारो कोटी कमवल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्यांनी केलाय. जिल्हा प्रशासन, जमीन माफिया आणि तटकरे यांच्या संगनमताने 3 वर्षांच्या कालावधीत 1000 कोटींचा जमीन घोटाळा झाला असा  आरोप सोमय्या यांनी केलाय.

 

तटकरे यांच्या कुटुंबीयांनी शेतकर्‍यांकडून कवडीमोल किंमतीत जमिनी विकत घेतल्या. आणि एसईझेड कंपन्याना विकल्यात. जमीन खरेदीसाठी कंपन्यांनी तटकरे यांच्या कुटुंबीयांना कर्ज दिलं असा दावा सोमय्यांनी केलाय. अलिबागमधल्या जिल्हाधिकारी कार्यालयात सोमय्या यांनी तटकरे यांच्याविरोधात जमीन घोटाळाचे पुरावे सादर केले. महसूल अधिकार्‍यांनी खोटे दस्तावेज तयार केल्याचं सोमय्यांनी जिल्हाधिकार्‍यांनी सांगितलं.

close