डॉ.विनायक मोरेंची तडकाफडकी बदली

July 16, 2013 10:22 PM0 commentsViews: 301

vinayak more16 जुलै : पुणे जिल्हा रूग्णालयाचे अधिकक्षक डॉ.विनायक मोरे यांची कुंटुब कल्याण विभागात सहाय्यक संचालकपदी तडकाफडकी बदली करण्यात आलीय.या बदलीच्या आदेशाबद्दल विनायक मोरे यांनी आश्चर्य व्यक्त केलंय. काही दिवसांपूर्वीच पिंपरी-चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्याकडून डॉ. विनायक मोरे यांना दमदाटी करण्यात आली होती. त्यानंतर आरोग्य सचिवांच्या वतीने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते.

 

मात्र चौकशी पूर्ण होण्याआधीच मोरे यांची बदली करण्यात आली. आमदार लक्ष्मण जगताप हे अजित पवार यांच्या अंत्यत जवळचे समजले जातात. राजकीय दबावापोटी आपली बदली करण्यात आल्याची शंका डॉ. विनायक मोरे यांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात आज डॉ. मोरेंनी मुंबईत आरोग्यमंत्र्यांचीही भेट घेतली. याप्रकरणी लक्ष घालणार असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी त्यांना आश्वासन दिलंय. आपल्या बदलीच्या निर्णयाविरोधात डॉ. विनायक मोरे यांनी मॅटकडेही धाव घेतलीय.

close