मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र देण्यास नकार

July 16, 2013 1:27 PM0 commentsViews: 116

jaat prmanptra416 जुलै : शिक्षणाचं माहेरघर समजल्या जाणार्‍या पुणे जिल्ह्यात महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून विद्यार्थी शिक्षण घ्यायला येतात. अनुसूचीत जाती आणि अनुसूचीत जमातीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलत मिळवण्याकरता जात प्रमाणपत्राची आवश्यकता असते.

 

मात्र,या विद्यार्थ्यांना नागरी सुविधा केंद्राकडून जातीचं प्रमाणपत्र देण्यास नकार दिला जातोय. 6 फेब्रुवारी 2006 च्या शासन निर्णयानुसार विद्यार्थी शिक्षणानिमित्त ज्या जिल्ह्यात शिक्षण घेत आहेत. त्या जिल्ह्यात जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करता येतो.

 

मात्र जातीचं प्रमाणपत्र हवं असेल तर तुमच्या मुळ गावी अर्ज सादर करा असं पुण्यातील नागरी सुविधा केंद्राकडून सांगण्यात येतंय. आपल्या वरील कामाचा भार कमी व्हावा या करिता पुणे जिल्हा प्रशासनाकडून दुसर्‍या जिल्ह्यात अर्ज करण्यास सांगण्यात येत असल्याचा आरोप विद्यार्थी आणि  पालकांनी केलाय.

close