बंगळुरूमध्ये कन्नड रक्षण वेदिकेचा राडा

January 22, 2009 7:18 AM0 commentsViews:

22 जानेवारी, बंगळुरूदीपा बालकृष्णनमहाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्नाचा तडाखा बंगळुरूमधल्या बँक ऑफ महाराष्ट्रलाही बसला आहे. बंगळुरूच्या गांधीनगर परिरातल्या बँका ऑफ महाराष्ट्रच्या शाखेवर कन्नड रक्षण वेदिकेच्या 20 ते 25 कार्यकर्त्यांनी हल्लाबोल केला आहे. आधी त्या शाखेसमोर वेदिकेच्या लोकांनी जोरदार निदर्शनं केली होती. नंतर बँकेची नासधूस करण्यास सुरुवात केली. कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांचा जमाव अधिक आक्रमक होण्यापूर्वी बंगळुरू पोलिसांनी 20 जणांना ताब्यात घेतलं आहे. गंधीनगर परिसरातल्यर बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेवरचा वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी केलेला हल्ला पाहता बंगळुरूमध्ये जेवढ्या जेवढ्या म्हणून बँकेच्या शाखा आहेत त्यात्या शाखांच्या बाहेर कडक पोलीस पाहारा ठेवला आहे. महाराष्ट्रातल्या कन्नड बँकेच्या शाखांवर केलेल्या हल्ल्यांना प्रत्त्युत्तर बंगळुरूमधले हल्ले असल्याचं दिसून आलं आहे. जोपर्यंत कन्नड बँकेवर हल्ले करणा-यांना महाराष्ट्र सरकार शिक्षा करत नाहीत, तोपर्यंत महाराष्ट्र बँकेवर हल्ले करणा-यांना कर्नाटक सरकार शासन करणार नसल्याचं दिसून येत आहे.

close