स्पॉट फिक्सिंग प्रकरणी द्रविड साक्षीदार

July 16, 2013 11:14 PM0 commentsViews: 235

rahul dravid16 जुलै : आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी दिल्ली पोलिसांनी राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन राहुल द्रविडची साक्ष नोंदवून घेतली. आयपीएलच्या सहाव्या हंगामात घडलेल्या स्पॉट फिक्सिंगप्रकरणी क्रिकेटर एस श्रीसंत, अजित चंडिला आणि अंकित चव्हाण यांना अटक करण्यात आली होती. हे तीनही खेळाडू राजस्थान रॉयल्स टीमचे असल्यानं याप्रकरणी राहुल द्रविडची साक्ष महत्वाची मानली जातेय. खेळाडूंची निवड केवळ खेळाच्या आधारे केली होती असं द्रविडनं म्हटलंय. द्रविडनंतर राजस्थान रॉयल्सचे कोच पॅडी उपटॉन यांचीही साक्ष नोंदवण्यात येणार आहे.

close