बोधगया बॉम्बस्फोट प्रकरणी संशयिताचे स्केच प्रसिद्ध

July 16, 2013 4:18 PM0 commentsViews: 207

bodhagaya blast17 जुलै : बिहार येथील बोधगयामध्ये 7 जुलै रोजी महाबोधी मंदिरात झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी तब्बल दहा दिवसांनंतर पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले आहेत. बॉम्ब पेरणार्‍या एका संशयिताचं स्केच आणि सीसीटीव्ही फुटेज एनआयएनं आज प्रसिद्ध केलं.

 

या संशियतानं महाबोधी वृक्ष, गौरी मंदिर आणि लॅम्प हाउस अशा तीन ठिकाणी बॉम्ब पेरल्याचा संशय आहे. एकापेक्षा जास्त साक्षीदारांनी या संशयिताला ओळखलंय. महाबोधी मंदिरात एकापाठोपाठ कमी क्षमतेचा 10 स्फोट झाले होते. या स्फोटात 2 जण जखमी झाले होते. महाबोधी मंदिरात स्फोट झाल्यामुळे देशभरातील मंदिरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून दहशतवाद्यांनी पुढील टार्गेट मुंबई असेल अशी धमकी दिलीय.

close