बिहार:मध्यान्ह भोजनामुळे विषबाधा,9 मुलांचा मृत्यू

July 16, 2013 11:33 PM0 commentsViews: 196

bihar chapra16 जुलै : बिहारमधल्या छाप्रामध्ये मध्यान्ह भोजनामुळे विद्यार्थ्यांना विषबाधा झालीय. त्यात 9 मुलांचा मृत्यू झालाय आणि 50 जणांची प्रकृती गंभीर आहे. घटनास्थळी प्रशासकीय अधिकारी दाखल झाले असून डॉक्टारांचं पथकही विद्यार्थ्यांची तपासणी करत आहे.

घटना घडल्यानंतर मुलांना मसरख येथील हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना छाप्रा येथील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलंय. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाखांची मदत जाहीर केलीय आणि या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहे.

विशेष म्हणजे मधान्ह भोजन ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना असून राज्य सरकारने लागू केलीय. ही योजना देशभरात 13 लाख सरकारी शाळेत लागू असून 12 कोटी विद्यार्थ्यांना याचा फायदा पोहचतोय.