भंडार्‍यात मायलेकींचा भूकबळी

July 17, 2013 3:17 PM0 commentsViews: 306

bhandara17 जुलै : पुरोगामी महाराष्ट्रात कुपोषणाचा प्रश्न आ वासून उभा असताना आता भूकबळीची समस्या निर्माण झालीये. अशीच एक हृदय पिळवटणारी घटना घडलीय. भंडारा जिल्ह्यातल्या लाखांदूर तालुक्यातल्या दोनाड गावात मायलेकींचा भूकबळी गेलाय. शेवता हरी तोदरे ही महिला आणि तिची मतिमंद मुलगी यांना खायला काहीही न मिळाल्यानं त्यांचा मृत्यू झाला. या दोघी गावात एका झोपडीत राहायच्या. शेवता असं महिलेचं नाव असून ती गावात काम करून आपलं पोट भरायच्या. पण, वयोमान आणि पावसामुळे घराबाहेर पडता न आल्यानं त्यांना खायला काहीही मिळालं नाही. घरातून दुर्गंधी यायला लागल्यानं गावकर्‍यांनी घर उघडून पाहिलं तर दोघीही खाटेवर मृत अवस्थेत आढळल्या. पण, हा भूकबळीचाच प्रकार आहे की नाही हे पोस्ट मॉर्टेम अहवालानंतरच कळू शकेल, असं पोलिसांचं म्हणणं आहे.

close