राणेसमर्थकांनी केली नवाकाळच्या कार्यालयाची तोडफोड

January 22, 2009 9:20 AM0 commentsViews: 96

21 जानेवारी, मुंबईदैनिक नवाकाळच्या मुंबई कार्यालयाची तोडफोड करण्यातआलीेये. नवाकाळ दैनिकातल्या संपादकीयमध्ये राणेंवर टीका करण्यात आल्यानं तोडफोड केलीये. राणे समर्थकांवर तोडफोड केल्याचा संशय व्यक्त केलाआहे. राणे समर्थकांचंच काम असल्याचं नवाकाळचे संपादक निळकंठ खाडिलकर यांचं म्हणणं आहे. " हातात शिगा घेऊन दोन इसम कार्यालयात शिरले. त्यांनी कार्यालायच्या काचा फोडण्यास सुरुवात केली. राणेंच्या विरोधात लिहिता काय, असं बोलत ते दोघं संपादकांनाअर्वाच्च्य भाषेत शिवीगाळ करत ते निघून गेले, " अशी माहिती ' नवाकाळ 'चे पत्रकार शंकर कडव यांनी दिली. अग्रलेखांसाठी प्रसिद्ध असणा-या दैनिक नवाकाळमध्ये ' शुभ बोल ना-या ' या शीर्षकाचा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे. त्या अग्रलेखामुळे नवाकाळच्या कार्यालयावर राणे समर्थकांनी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत हल्ला केला असल्याचं 'नवाकाळ'चे संपादक निळकंठ खाडिलकर म्हणाले. ' अशा भ्याड हल्ल्यांना दबून राहून मी माझं लिखाण थांबवणार नाही, असंही निळकंठ खाडिलकरांनी सांगितलंय. " 'नवाकाळ'मध्ये छापून आलेलं नारायण राणेंच्या समर्थकांना आवडलं नसेल म्हणून त्यांच्या चाहत्यांनी तसं केलं असेल. मीडियानंही काय छापावं, काय छापू नये याचं भान राखलं पाहिजे, "अशी या हल्ल्यावरची प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिलीये. नवाकाळच्या कार्यालयावरच्या हल्ल्याचा ' लोकमत 'चे संपादक दिनकर रायकर यांनी निषेध केला आहे. ' लोकशाहीमध्ये मीडियावर होणारे हल्ले पाहता आता सरकारनं यात लक्ष घालण्याची वेळ जवळ आल्याचं, ' दिनकर रायकरांचं म्हणणं आहे.

close