राज्यात 13 लाख चिमुरड्यांना कुपोषणाचा विळखा

July 17, 2013 2:06 PM1 commentViews: 209

Image img_176932_kuposhan_240x180.jpg17 जुलै : महाराष्ट्र राज्यात एकूण 64 लाख लहान बालकांपैकी एकूण 13 लाख लहान मुलं कुपोषणाच्या विळख्यात आहेत. त्यातली 4 लाख लहान मुलं एसएएम (SAM) म्हणजेच सिव्हिअर ऍक्युट आणि एमएएम (MAM) म्हणजे मिडिअम ऍक्युट मालन्युट्रीशन या वर्गवारीमध्ये आहेत. राज्याच्या आरोग्य सचिवांनीच ही आकडेवारी जाहीर केलीय.

त काम करणार्‍या खोज या संस्थेच्या सदस्या पूर्णिमा उपाध्याय यांनी 9 जुलैला मुंबई हायकोर्टात या संदर्भात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर उत्तर देताना राज्य सरकारतर्फे जे शपथ पत्र दाखल करण्यात आलं. त्यात असं सांगण्यात आलं की, राज्यात 13 लाख मुलं आजही कुपोषणाच्या विळख्यात आहेत. राज्य सरकारच्या विविध खात्यांमध्ये सुसंवादाचा आभाव आहे आणि याच कारणामुळे कुपोषणाची स्थिती दिवसेंदिवस खराब होत चाललीय. राजमाता जिजाऊ मिशनमध्ये चाईल्ड डेव्हलपमेंट सेंटरच्या माध्यमातून लक्षच देण्यात आलेलं नाही असे आरोप पूर्णिमा उपाध्याय यांनी केले आहे.

  • सूर्यकांत कुलकर्णी

    गेली २० वर्षे हा प्रश्न बोलला जातोय. मेळघाट मधील कुपोषित मुलांबद्दल श्री अभय बंग यांनी “कोवळी पांगल” नावाने रिपोर्ट प्रसिद्ध केला-ज्याच्यावर खूप टीका शासनाने केली त्यालाही आता १५ वर्षे झाली.

    वर्षानुवर्षे न सुटू शकणारा हा प्रश्न आहे का? मेळघाटात खूप संस्था यावर काम करतात, तरीही तिथे कुपोशीत बालकांचे मृत्यू होतातच.
    शासनाने याकडे गंभीरतेने पाहायला हवे, पण ते पहात नाहीत हे वेगळे म्हणण्याची गरज नाही. राज्यात १३ लाख म्हणजे २०% कुपोषित आहेत हे महाराष्ट्राला शोब्णारे नाहीच, पण हे दुर्लक्ष करणे हे पाप किती या पेक्षा ही मुले जगलीच तरी त्यांचे उद्याचे जीवन कसे आसेल?

close