बालगुन्हेगाराची वयोमर्यादा 18 वर्षेच !

July 17, 2013 2:21 PM0 commentsViews: 118

Image img_224342_suprimcourt3_240x180.jpg17 जुलै : दिल्लीत घडलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी अटकेत असलेल्या अल्पवयीन आरोपीला कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी लावून धरण्यात आली होती. या निमित्ताने अल्पवयीन गुन्हेगाराची वयोमर्यादा 18 वरून 16 करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, अल्पवयीन गुन्हेगाराच्या वयोमर्यादेत बदल करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिलाय.

सध्या ही वयोमर्यादा 18 वर्षांची आहे, मात्र ती कमी करून 16 वर्षावर आणावी अशी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. ती सरन्यायाधीश अल्टामास कबीर यांच्या खंडपीठाने फेटाळली आहे. गेल्या वर्षी संपूर्ण देशात संतापाची लाट आणणार्‍या दिल्ली बलात्कार प्रकरणामध्ये एक आरोपी 17 वर्षांचा होता. मिळालेल्या माहितीनुसार, तोच आरोपी सर्वात क्रूरपणे वागला होता. मात्र, त्याचे वय अठरा वर्षांपेक्षा कमी असल्यानं त्याला जास्तीत जास्त तीन वर्षांची शिक्षा होऊ शकते. या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरतो.

close