महामार्गांवर दारूबंदी

July 17, 2013 5:51 PM0 commentsViews: 367

17 जुलै : दारू पिऊन हायवेवर होणार्‍या अपघातांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने कडक पाऊल उचलले आहे. हायवेवर असलेल्या दारूच्या दुकानांवर कारवाई करा असे आदेश राज्य सरकानं सर्व जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत. मात्र ही कारवाई काय असेल हे मात्र अजून स्पष्ट करण्यात आलेलं नाही. तसंच नव्या दुकानांना परवानगी देवू नये असे आदेशही राज्य सरकारनं दिले आहेत. उत्पादन शुल्क मंत्री गणेश नाईक यांनी लेखी उत्तरात विधान परिषदेत ही माहिती दिलीय. दारू पिऊन गाडी चालवल्यामुळे होणार्‍या अपघातांमध्ये वाढ झाल्यानं केंद्रानं अशा दुकानांवर कारवाई करण्याची विनंती राज्य सरकारला केली होती.

close