छाप्रामध्ये निदर्शनं

July 17, 2013 5:53 PM0 commentsViews: 97

17 जुलै : बिहारमधल्या छाप्रामध्ये धरमसती गावात मध्यान्ह भोजन घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना विषबाधा होऊ त्यामध्ये आतापर्यंत 22 मुलांचा मृत्यू झाला असून 10 मुलांची प्रकृती गंभीर आहे. तर 50 जणांवर उपचार सुरू आहेत. शाळेतलं मध्यान्ह भोजन घेतल्यानंतर 50 मुलांची प्रकृती अत्यावस्थ झाली, ही सर्व मुलं आठ ते बारा वयोगटातील आहेत. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाखांची मदत जाहीर केलीय आणि या घटनेच्या चौकशीचे आदेश दिलेत. दरम्यान या घटनेनंतर छाप्रामध्ये संतप्त जमावानं निदर्शनं केली. हॉस्पिटल आणि मध्यान्ह कार्यालयात नागरिकांनी तोडफोड केली. बिहार सरकारनं याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. राष्ट्रीय जनता दल आणि भाजपनं आज या घटनेच्या निषेेधार्थ छाप्रा जिल्हा बंद पुकारला आहे.

close