रिमाचं एकपात्री नाटक ‘तुला मी मला मी’ रंगभूमीवर

January 22, 2009 10:30 AM0 commentsViews: 192

22 जानेवारी मुंबईमाधुरी निकुंभ अभिनेत्री रिमाचं एकपात्री नाटक 'तुला मी मला मी' सध्या रंगभूमीवर चालू आहे. त्याचं दिग्दर्शन केलंय, विवेक लागू यांनी. मानवी नातेसंबंध रेखाटताना या नाटकात काही वेगळे प्रयोगही केलेत. सध्या इलेक्ट्रॉनिक मीडियाचा प्रभाव खूप मोठा आहे आणि नेमका तोच धागा पकडत 'तुला मी मला मी' हे नाटक उभं राहिलंय.या नाटकात नातेसंबध तर आहेच पण नाटक नायिका, तिची अपंग बहीण आणि नवरा यांच्या भोवती फिरतं. एकूण 80 मिनिटांच्या या नाटकात अभिनेत्री रिमा दुहेरी भूमिकेत दिसतात. नाटकातली एकूण 55 मिनिटं स्टेजवरचं पात्र स्क्रिनमधल्या दुस-या पात्राशी संवाद साधतं आणि नाटक आकार घेतं. नाटकातल्या लेखिकेचीच प्रतिमा तिची मुलाखत घेते. मराठी रंगभूमीवरच्या या वेगळ्या प्रयोगाला पसंतीची पावती मिळेल, असा विश्वास 'तुला मी मला मी' या नाटकाच्या टिमचा आहे.

close