विदर्भ-दक्षिण महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम

July 17, 2013 7:23 PM0 commentsViews: 796

 

17 जुलै : दुष्काळाने होरपळलेल्या महाराष्ट्रात पावसाने दुसर्‍या महिन्याच्या अखेरीपर्यंत सर्वत्र जोरदार बरसतोय. पश्चिम महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावलीय. कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे दोन फुटांनी उचलले आहेत. पाणीसाठी नियंत्रणात ठेवण्यासाठी धरणातून 9,500 क्युसेक वेगानं पाणी सोडण्यात येतंय. गेल्या वर्षीच्या तुलनेत कोयना परिसरात यावेळी आतापर्यंत जास्त पाऊस झालाय.

चंद्रपूरमध्ये नदी,नाले तुडुंब

तर चंद्रपूर जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे ईरई नदीला पूर आलाय. पुरात एक तरुण वाहून गेला.शहराच्या रहमत नगरमध्ये पाणी शिरलंय. तर दाताळा मार्ग पाण्याखाली गेलाय. त्यामुळे वाहतूक ठप्प झालीय. गडचिरोली जिल्ह्यातही कालपासून जोरदार पाऊस सुरू आहे. कठाणी नदीला पूर आलाय. गडचिरोली-नागपूर संपर्क तुटलाय. प्राणहिता नदीच्या पातळीत वाढ झालीय. त्यामुळे सिरोंचा, अहेरी तालुक्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.

जालन्याला पावसाने झोडपले

दुष्काळग्रस्त मराठवाड्यातही वरुणाराजाने कृपादृष्टी अखेर दाखवलीय. जालना जिल्ह्यातही पावसानं जोर धरलाय. आत्तापर्यंत जिल्ह्यात 287.21 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पाऊस चांगला झाल्यानं शेतीच्या पेरण्या पूर्ण झाल्यात. त्यामुळे दुष्काळानं होरपळणार्‍या जालनाकरांना दिलासा मिळालाय.

  • राज्यभरातील धरणांतली स्थिती

1) मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या धरणातला पाणीसाठा
अपर वैतरणा – 98 टक्के भरलं
तुलसी – 100 टक्के भरलं
2) रत्नागिरी जिल्ह्याला पाणी पुरवठा
गडनदी – 95 टक्के भरलं
3) कोल्हापूर जिल्ह्याला पाणीपुरवठा – राधानगरी धरण – 76 टक्के भरलं
4) पुणे शहराला पाणी पुरवठा करणारी धरणं
वरसगाव धरण – 48 % टक्के भरलं
खडकवासला धरण – 39 % टक्के भरलं
5) नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारं गंगापूर धरण -65 टक्के भरलं
6) नागपूर जिल्ह्याला पाणीपुरवठा – पेंच – 70
गोंदिया, गडचिरोली, भंडारा जिल्ह्यांना पाणीपुरवठा करणारा – गोसीखुर्द धरण – 93 टक्के भरलं
7) औरंगाबाद जिल्ह्याला पाणीपुरवठा
जायकवाडी धरण – 15 टक्के भरलं
जालना – जुई – 2.3 भरलं
8) सोलापूर, उस्मानाबाद जिल्ह्याला पाणीपुरवठा -
 उजनीमध्ये फक्त गाळ.. डेड स्टॉकमधून पुरवठा – (-15)

close