महिंद्राने 500 कामगारांना कामावरून काढले

July 17, 2013 8:46 PM0 commentsViews: 2089

 17 जुलै : महिंद्रा अँड महिंद्राच्या चाकणमधल्या कारखान्यातून 500 कंत्राटी कामगारांना कामावरून कमी करण्यात आलंय. तसंच नवी भरतीही थांबवण्याचा निर्णय कारखान्याच्या व्यवस्थापनानं घेतलाय. गेल्या काही महिन्यांमध्ये या कारखान्याच्या उत्पादन विक्रीमध्ये घट झाली होती. कंपनी येत्या तीन वर्षांमध्ये 5000 कोटी रुपयांचे भागभांडवल बाजारात आणणार आहे. आता तो निर्णय पुढे ढकलला जाऊ शकतो. मात्र, यामुळे कंपनीच्या वाहनविक्रीवर विपरीत परिणाम होणार नाही असा विश्वास महिंद्रा अँड महिंद्रामार्फत व्यक्त करण्यात आलाय. मात्र 500 कामगारांना कमी करण्यात आल्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आलीय. कामगारानी या विरोधात निषेध व्यक्त केला.

close