बेळगावात झालं मिनी विधानसभेचं भूमिपूजन

January 22, 2009 2:02 PM0 commentsViews: 8

22 जानेवारी, बेळगाव कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी बेळगावमधल्या मिनी विधानसभेचं भूमिपूजन केलंय. बेळगावमध्ये मिनी विधानसभेची वास्तू बांधण्याला बेळगावातल्या मराठी लोकांचा विरोध आहे. त्यात या मिनी विधानसभेचा प्रश्न सुप्रीम कोर्टात आहे. तरीही मिनी विधानसभेच्या इमारतीचं भूमीपूजन करून मराठी लोकांच्या जखमेवर मीठ चोळलंय, असं महाराष्ट्र एकीकरण करायला समितीचं म्हणणं आहे. कर्नाटक सरकारच्या कृत्यावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्र एकीकरण समितीचे तालुका अध्यक्ष निंगोजी हुद्दार म्हणाले, " वेलिकुमारस्वामींनी मिनी विधान परिषद बांधण्याचा प्रस्ताव मांडला. प्रस्ताव मांडून ते घरी गेले. येडियुरप्पा सरकारचीही तिच परिस्थिती आहे. आता जर ही इमारत इथे बांधली तर समस्त सीमा वासीयांवर अन्याय होईल. 56 वर्षांच्या आंदोलनाला ही इमारत कोलमोडून टाकल्याशिवाय राहणार नाही. बेळगाव महाराष्ट्रात जाण्यासाठी आम्ही सगळं केलं आहे." मिनी इमारतीचं भूमिपूजन करून कर्नाटक सरकारनं बेळगावातल्या मराठी माणसाच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं असल्याची प्रतिक्रिया बेळगावचे माजी महापौर शिवाजी सुंटकर यांनी दिलीये.

close