अल्पसंख्याक मंत्र्यांच्या जिल्ह्यातच विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित

July 17, 2013 9:56 PM1 commentViews: 91

17 जुलै : अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेल्या अल्पसंख्याक शिष्यवृत्ती योजनेचा राज्यात पुरता बोजवारा उडाल्याचं चित्र आहे. विशेष म्हणजे अल्पसंख्याक खात्याच्या राज्यमंत्री फौजिया खान यांच्या जिल्ह्यात म्हणजे परभणीतही तशीच स्थिती आहे. एकट्या परभणी जिल्ह्यात जवळपास 20 हजार अर्जांपैकी 15 हजारांपेक्षा जास्त अर्ज आजही शिक्षण विभागाकडे प्रलंबित आहेत. शिवाय अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मिळणारा उपस्थिती भत्ता आणि गणवेशही गेल्या 2 वर्षांपासून या विद्यार्थ्यांना मिळालेला नाही. या समस्यांबाबत फौजिया खान यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. उपशिक्षण अधिकारी ए. के. ठाकूर यांनी मात्र ऑगस्ट अखेर सर्व प्रलंबित अर्ज भरून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून देण्याचं आश्वासनही त्यांनी दिलंय.

  • FAIZ SHAIKH

    sarv maharashtra madhye heech sthithi aahe moulana azad mahamandalacha tar bojwara udala aahe

close