स्लमडॉग मिलेनियरला 10 ऑस्कर नामांकने

January 22, 2009 1:57 PM0 commentsViews: 2

22 जानेवारी मुंबईगोल्डन ग्लोबनंतरही स्लमडॉग मिलेनियरची घोडदौड सुरूच आहे. ऑस्करची नामांकन जाहीर झाली आहेत. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे स्लमडॉग मिलेनियर या सिनेमाला ऑस्करसाठी 10 नामांकने मिळाली आहेत. सर्वोत्कृष्ट सिनेमा, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी डॅनी बोएलला, बेस्ट ऍडाप्टेड स्क्रीनप्लेसाठी सायमन ब्युफॉय, रेसुल पो कुट्टी याला साउंड मिक्सिंगसाठी नामांकनं मिळाली. आणि रेहमानला म्युझिकसाठी तीन नामांकनं मिळाली. त्यात जय हो आणि ओ साया या गाण्यासाठी नामांकन मिळालं आहे. तसंच गीतकार गुलजार यांना जय हो गीतासाठी नामांकन मिळालं.छायाचित्रणासाठीही सिनेमाला नामांकन मिळालंय. याशिवाय स्लमडॉग मिलेनियरला संकलनासाठी नामांकन मिळालं. अशी सिनेमाला 10 नामांकने मिळाली आहेत.फेब्रुवारी महिन्यात ऑस्करचं वितरण होईल.

close