बीडमध्ये दलितांची घरं पाडली

July 17, 2013 11:01 PM2 commentsViews: 622

17 जुलै : पुरोगामी महाराष्ट्रात आजही दलितांना हीन दर्जाची वागणूक देण्यात येत असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. बीड जिल्ह्यातल्या कुसलंबी या गावात दलितांची 21 घरं जेसीबीनं पाडण्यात आली. गावात मंदिराशेजारी दलितांची वस्ती आहे. मंदिरात जाऊन दलित लोक मंदिर बाटवतील, विहिरीतलं पाणी घेतील म्हणूनच आपली घरं पाडण्यात आल्याचा आरोप दलितांनी केलाय. गावात सोमवारी शिवनाथ पवार नावाच्या व्यक्तीन दवंडी पिटून गावकर्‍यांना मंदिराशेजारी बोलावलं. आणि मंदिराशेजारी असणारी दलितांची घरं पाडून टाकण्याचं आवाहन केलं. त्यानंतर जवळपास 400 जणांच्या जमावानं दलितांची घरं जेसीबीच्या साहाय्यानं पाडून टाकली. इतकंच नाही तर मंदिराशेजारी दलित नको म्हणणार्‍या या गावकर्‍यांनी दलितांच्या मोडलेल्या घरांचे पत्रे मात्र सोबत नेले. गावकर्‍यांनी संख्येनं जास्त असल्यानं आपल्याला तिथून पळ काढावा लागला, असं दलितांनी सांगितलंय. गावानं बहिष्कार टाकल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. ऐन पावसाळ्यात घरं पाडल्यानं आता दलितांना समाजमंदिरात आसरा घ्यावा लागलाय.

  • Deepak Gedam

    manhe aapan purogami maharshtrat rahto,kasla kay?

  • atul m gotsurve

    deplorable!culprits should be brought to the book without delay

close