मडिबांच्या भूमीतून !

July 17, 2013 11:26 PM0 commentsViews: 192

17 जुलै : दक्षिण आफ्रिकेचे क्रांतीकारी नेते आणि जनतेचे लाडके नेते मडिबा नेल्सन मंडेला यांचा उद्या 95 वा वाढदिवस आहे. मंडेलांनी केवळ दक्षिण आफ्रिकेच्या स्वातंत्र्यलढ्यालाच बळ दिलं नाही तर जगभरातल्या स्वातंत्र्य चळवळींना प्रेरणा दिली. म्हणूनच संयुक्त राष्ट्रसंघाने 2009 साली 18 जुलै हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय मंडेला दिवस’ म्हणून घोषित केलाय. उद्याचा दिवस मंडेला ट्रस्टतर्फे मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. नेल्सन मंडेला यांनी आपल्या आयुष्यातली 67 वर्ष वर्णभेदाविरोधात समता आणि स्वातंत्र्यासाठी स्वत:चं आयुष्य खर्च केलंय. यानिमित्तच 18 जुलैची मंडेला दिनाची संकल्पना आधारित आहे. बदल घडवण्यासाठी पुढे या, उद्याच्या दिवसातील 67 मिनिटं बदल घडवायला द्या, असा संदेश जगभरातून मंडेलांचे चाहते देत आहे. “टेक ऍक्शन, इन्सपायर चेन्ज, मेक एव्हरी डे अ मंडेला डे” (Take Action; Inspire Change; Make Every Day a Mandela Day)अशी त्यांची घोषणा आहे. सध्या मंडेला दक्षिण आफ्रिकेची राजधानी प्रेटोरिया इथं अत्यवस्थ आहेत.. त्यांच्या हॉस्पिटलला भेट दिल्यानंतर आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी केलेला हा स्पेशल रिपोर्ट…

close