‘अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडितांना 3 लाखांची भरपाई द्या’

July 18, 2013 3:14 PM0 commentsViews: 175

Image img_227002_supriamcoart33_240x180.jpg18 जुलै :अ‍ॅसिड हल्ल्यातल्या पीडितांना भरपाई देण्याचा महत्त्वपूर्ण आदेश सुप्रीम कोर्टाने आज राज्य सरकारांना दिले आहे. या पीडितांना तीन लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश कोर्टाने दिलेत. त्यापैकी एक लाख रुपये पहिल्या पंधरा दिवसांत द्यावे लागणार आहेत. या पीडितांचा वैद्यकीय उपचार आणि पुनर्वसनाचा खर्च सरकारला उचलावा लागणार आहे.

 

मुख्य म्हणजे हे हल्ले कमी करण्यासाठी फोटो ओळखपत्राशिवाय अ‍ॅसिड विकत मिळणार नाही असंही सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलंय. अशा प्रकारे ओळखपत्र नसलेल्या व्यक्तीला अ‍ॅसिड विकल्यास विक्रेत्याला 50 हजारांचा दंड ठोठावला जाईल असं कोर्टानं सांगितलंय. एकतर्फी प्रेमातून अथवा अन्य प्रकरणातून महिलांवरअ‍ॅसिड हल्ल्याचे प्रकार वाढलेत.

 

दोन महिन्यापूर्वी वांद्रे टर्मिनसवर प्रीती राठी या तरूणीवर ऍसिड झाला होता. या हल्ल्यांना निर्बंध घालण्यासाठी राज्य सरकार काही उपाय योजना करेल का अशी विचारणा सुप्रीम कोर्टाने केली होती. यावर राज्य सरकारने विना परवाना अ‍ॅसिड विक्री करता येणार नाही तसंच ओळखपत्र असल्याशिवाय खरेदी करत येणार नाही असे आदेश दिले होते. यावर सुप्रीम कोर्टाने आज गुरूवारी आपला निर्णय देत राज्य सरकारांना अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडितांना आर्थिक मदत करण्याचे आदेश दिले आहे. सुप्रीम कोर्टाच्या या आदेशावर पीडितांनी आनंद व्यक्त केलाय.
 

close