‘आमदारांचं निलंबन मागे घ्या’

July 18, 2013 3:36 PM0 commentsViews: 491

mla5518 जुलै : पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी निलंबित आमदारांसाठी विरोधक सरसावले. पीएसआय सूर्यवंशी मारहाण प्रकरणी निलंबित झालेल्या आमदारांचं निलंबन मागे घ्यावं, अशी मागणी आज विरोधी पक्षनेते एकनाथ खडसेंनी केल्यानंतर विरोधक आक्रमक झाले. त्यानंतर विधानसभेत 10 मिनिटं गदारोळ झाला. पण विरोधी आमदारांनी सत्ताधारी पक्षाशी चर्चा करुन तीन आमदारांच्या निलंबनाच्या प्रश्नावर चर्चा करावी आणि यातून तोडगा काढावा अशी सूचना विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी केलीय.

त्यानंतर कामकाजाला सुरळीत सुरवात झालीय. वसईचे आमदार क्षितीज ठाकूर आणि मनसेचे आमदार राम कदम यांनी पीएसआय सचिन सूर्यवंशी यांना विधानभवनाच्या आवारात मारहाण केली होती. या प्रकरणी राम कदम आणि क्षितीज ठाकूर यांना अटक करण्यात आली होती तसंच त्यांना तीन दिवसांचा तुरुंगवास भोगावा लागला होता.

या प्रकरणी राम कदम आणि ठाकूर यांच्यासह शिवसेना,भाजपच्या तीन आमदारांनाही दोषी धरण्यात आलं होतं आणि त्यांना निलंबित करण्यात आलं होतं. मात्र तपासानंतर या तिन्ही आमदारांचं निलंबन मागे घेण्यात आलं होतं. हिवाळी अधिवेशनातच ठाकूर आणि कदम यांचं निलंबन पावसाळी अधिवेशनात मागे घेण्यात यावं अशी मागणी करण्यात आली होती.

close