यापुढे ‘नीट’ परीक्षा होणार नाहीत !

July 18, 2013 2:11 PM0 commentsViews: 650

sc on neet18 जुलै : वैद्यकीय प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी..पुढच्या शैक्षणिक वर्षापासून देशामध्ये वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवरील परीक्षा अर्थात नीट (NEET) होणार नाहीत, असा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने दिलाय. यासोबतच वैद्यकीय प्रवेशासाठीचे खासगी संस्थाचालकांचे हक्कही कोर्टाने कायम ठेवलेत.

 

मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया खासगी संस्थाचालकांच्या या अधिकारावर अतिक्रमण करू शकत नाही असं स्पष्ट करताना कोर्टाने नीट घेण्याचा एमसीआयचा प्रस्ताव फेटाळून लावला.

 

दरम्यान,महाराष्ट्रासारख्या ज्या राज्यांनी या वर्षी नीट घेतली होती, त्यांचे यंदाचे प्रवेश हे नीटनुसार होतील, पण खरा प्रश्न आहे तो यंदा 12 वी शिकणार्‍या विद्यार्थ्यांचा. ही मुलं 11 वीपासून म्हणजे गेली दीड वर्ष नीट परीक्षेची तयारी करतायेत आणि अचानक आता नीट होणार नाही हे जाहीर झालंय. यामुळे हे पालक-विद्यार्थी संभ्रमात आहेत.

close