भाज्या स्वस्तात मस्त पण कांदा पुन्हा रडवणार?

July 18, 2013 1:03 PM0 commentsViews: 205

mumbai veg18 जुलै : राज्य सरकारने स्वस्तात मस्त भाजी योजनेचा शुभारंभ केला त्याचे चांगले परिणाम पाह्याला मिळताय. भाज्यांचे दर निम्म्यानं खाली आले आहेत. दोन दिवसापासून पावसामुळे भाज्या वाशीच्या मार्केट कमिटीमध्येच पडून आहेत. त्यातच आज सातशे ते आठशे गाड्यांची आवक झाल्यानं भाज्यांचे दर खाली आले आहेत. आजच्या भाज्यांचा दर कोबी दहा रुपये किलो, वाटाणा 28 रुपये किलो, फ्लावर 50 रुपये किलो, भेंडी 28 रुपये किलो या दराने लिलावात विकली गेली होती. याच भाज्यांचे दर गेल्या आठवडाभरापासून दुपटीपेक्षाही जास्त होते.

 

कांदा पुन्हा रडवणार

दुसरीकडं कांद्यानं पुन्हा एकदा ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणलंय. मुंबईत कांदा चाळीस रुपये किलोच्या पुढे गेलाय. गेल्या तीन दिवसांत लासलगाव बाजारपेठेत कांद्याचा भाव वीस रुपयांपेक्षा खाली होता, तरीही किरकोळ बाजारपेठेत कांदा दुप्पट भावाने विकला जात असल्यानं साठेबाजांकडून ग्राहकांची पिळवणूक होताना दिसतेय. आज लासलगाव बााजारपेठेत कांदा 2,500 रुपये प्रतिक्विटंल वर गेलाय. ते पाहता कांद्याचा भाव किरकोळ बाजारपेठेत तीन दिवसानंतर वाढायला हवे होते. पण साठवणूकदारांनी ते अचानक वाढवल्यानं ग्राहकांची पिळवणूक होतेय. यावर मुंबई आणि लासगावच्या बाजारपेठात कशी तफावत आहे यावर प्रकाश टाकणार आहेत.

close