चौकशीत सत्यमचे अनेक घोटाळे बाहेर

January 22, 2009 2:59 PM0 commentsViews: 1

22 जानेवारी सत्यम कंपनीचे एकामागोमाग एक वेगवेगळे घोटाळे बाहेर पडत आहेत. सत्यम कंपनीनं आतापर्यंत प्रॉफिटची रक्कम फुगवून सांगितली होती.पण आता कंपनीनं त्यांच्या कर्मचा-यांची रक्कमही फुगवून सांगितल्याचं उघड झालंय. कंपनीचे 53 हजार कर्मचारी असल्याचं सांगण्यात येत होतं. पण कंपनीत प्रत्यक्ष कर्मचारी आहेत फक्त 40 हजार. कंपनीच्या कर्मचा-यांचे खोटे आकडे वाढवून त्यांचा पगार स्वतःच्या खात्यात वळता करण्याचं कारस्थान रामलिंग राजू यांनी आत्तापर्यंत केलं. या बोगस कर्मचा-यांच्या नावे दर महिन्यात 20 कोटी इतकी रक्कम काढली जात होती. पण रामलिंग राजूच्या वकिलांनी याचा इन्कार केला आहे. कर्मचा-यांच्या संख्येविषयी राजू यांनी कोणतंच वक्तव्य केलं नाही. यासंबंधी पोलीसचं खोटं बोलत असल्याचा दावा राजूचे वकील भरत कुमार यांनी केलाय. दरम्यान राजूच्या सीआयडी कोठडीत एक दिवसांची वाढ केली आहे. त्याशिवाय कंपनीचे माजी सीएफओ श्रीनिवास वदलामणी यांच्याही कोठडीत एक दिवसांची वाढ कऱण्यात आली आहे. पण राजूचा भाऊ रामा राजूला पुन्हा न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे. सीआयडीनं राजूच्या कोठडीत तीन दिवसांची वाढ करण्याची मागणी केली होती. पण ही मागणी फेटाळण्यात आली आहे.

close