विठ्ठल दर्शनासाठी लांबच लांब रांग

July 18, 2013 1:45 PM0 commentsViews: 421

आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी आज दुपारपर्यंत 7 लाख भाविक पंढरपुरात दाखल झालेत. अवघी पंढरीनगरी हरिनामाच्या गजरानं दुमदुमलीय. प्रत्येक रस्त्यावर वारकर्‍यांची अलोट गर्दी पाहायला मिळतेय. चंद्रभागेच्या तीरावर तर वैष्णवांचा महासागर लोटलाय. भाविकांसाठी तीन वेगवेगळ्या पद्धतीनं दर्शनाची सुविधा उपलब्ध करण्यात आलीय. त्यात मुखदर्शन, पदस्पर्श दर्शन आणि ऑनलाईन दर्शन यानुसार मुखदर्शनासाठी सध्या 8 तासांचा कालावधी लागतोय. पदस्पर्श दर्शनासाठी 19 तासांचा वेळ लागतोय. तर ऑनलाइन दर्शनासाठी 2 तासांचा कालावधी लागतोय. उद्या पंढरपुरात 10 ते 12 लाख भाविक दाखल होतील असा प्रशासनाचा अंदाज आहे. दरम्यान आज संध्याकाळी सर्व प्रमुख संतांच्या पालख्या पंढरीत दाखल होणार आहेत. त्यामुळे पंढरपूरचं वातावरण ‘अवघा रंग एक झाला…रंगी रंगला श्रीरंग’ असं होऊन जाणार आहे.

close