मंडेलांचा आज 95वा वाढदिवस

July 18, 2013 5:18 PM0 commentsViews: 244

18 जुलै : दक्षिण आफ्रिकेचे क्रांतीकारी नेते आणि जनतेचे लाडके नेते मडिबा नेल्सन मंडेला यांचा आज 95 वा वाढदिवस आहे. ांडेलांनी केवळ दक्षिण आफ्रिकेच्याच स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले असं नाही तर त्यांनी जगभराच्या स्वातंत्र्य चळवळीलाही हातभार लावला. त्यामुळेच नोव्हेंबर 2009 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेने 18 जुलै हा मंडेलांचा जन्मदिवस जगभर मंडेला दिवस म्हणून पाळण्याचा निर्णय घोषित केला. आजचा दिवस मंडेला ट्रस्टतर्फे मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. नेल्सन मंडेला यांनी आपल्या आयुष्यातली 67 वषंर् वर्णभेदाविरोधात समता आणि स्वातंत्र्यासाठी खर्च केलीयेत. यावरच 18 जुलैची मंडेला दिनाची संकल्पना आधारित आहे. बदल घडवण्यासाठी पुढे या, आजच्या दिवसातली 67 मिनिटं बदल घडवायला द्या, असा संदेश जगभरातून मंडेलांचे चाहते देत आहे. सध्या मंडेला यांच्यावर दक्षिण आफ्रिकेची राजधानी प्रिटोरियामधल्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरुयत

close