पंतप्रधानांवर बायपास सर्जरीची शक्यता

January 22, 2009 4:56 PM0 commentsViews: 4

22 जानेवारी दिल्लीलोकसभा निवडणुकीत युपीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून डॉ. मनमोहनसिंग यांचं नाव काँग्रेसनं पुढे केलं आहे. मात्र पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग यांच्यावर सर्जरी होण्याची शक्यता आहे. त्यांची अँजिओग्राफी करण्यात आली आहे. पंतप्रधानांचं बायपास ऑपरेशन होईल किंवा त्यांची अँजिओप्लास्टी केली जाणार आहे. पंतप्रधानांवर कसे उपचार केले जातील याबाबत हृदयरोग तज्ज्ञांची मीटिंग होणार आहे. मात्र डॉक्टरांनी पंतप्रधानांना आठवडाभर दगदग न करण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान पंतप्रधानांची तब्बेत उत्तम असल्याचं काँग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी सांगितलं आहे.

close