वर्ध्यात पावसाचा धुमाकूळ, जनजीवन विस्कळीत

July 18, 2013 5:38 PM1 commentViews: 395

18 जुलै : वर्धा जिल्ह्यात मुसळधार पावसानं तिसर्‍या दिवशीही जनजीवन विस्कळीत झालंय. पुरात 2 जण वाहून गेलेत तर समुद्रपूर तालुक्यातल्या गोविंदपूर या गावात एक वयोवृद्ध मनुष्य तर भूगाव इथं एक तरुण नाल्यात वाहून गेलेत. जिल्ह्यात वाहून जाणार्‍यांची संख्या 4 झालीय. तसंच अनेक घरांची पडझड झाली आहे. नांदोरा, चानकी, कानगाव, सरूळ, टाकळी या गावांचा जिल्ह्याशी संपर्क तुटलाय. वायगाव, सेवाग्राम, इंजापूर, बोरगाव, कुरजडी, सेलू, भूगाव या गावांमध्ये घरात पाणी शिरलंय. यशोदा नदीला पूर आल्याने 2 हजार हेक्टरमधली पिकं वाहून गेली. वर्धा-राळेगाव मार्ग तिसर्‍या दिवशीही बंद आहे.

  • Neochem Tutorials Wardha

    abhutpurva aani avismarniya paus

close