स्लमडॉग मिलेनियरच्या नावावर आक्षेप

January 22, 2009 9:25 AM0 commentsViews: 6

22 जानेवारी मुंबईस्लमडॉग मिलेनियर हा सिनेमा हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये शुक्रवारी मुंबईत प्रदर्शित होतोय. पण या सिनेमाच्या नावावर मुंबईतील काही संघटनांनी आक्षेप घेतलाय. सिनेमाचं सध्याचं नाव लवकरात लवकर बदला या आपल्या मागणीसाठी या सिनेमातील प्रमुख कलाकार अनिल कपूर याच्या मुंबईतील घरावर गुलाबाची फुलं घेऊन शांततेत निदर्शनं करण्यात आली. स्लमडॉग मिलेनियर या सिनेमाला नुकताच प्रतिष्ठेचा गोल्डन ग्लोब हा मानाचा पुरस्कार मिळाला आहे. या सिनेमात मुंबईतील गरिबीचं भीषण वास्तव चित्रण करण्यात आलं आहे. अभिनेते अमिताभ बच्चन यांनी नुकतंच आपल्या ब्लॉगमधून या सिनेमातील काही दृश्यांबाबत नाराजी व्यक्त केली होती.

close