आयएनएस शिक्राला देण्यात आली अधिकृत कमांड

January 22, 2009 7:40 AM0 commentsViews: 3

22 जानेवारी मुंबईमुंबईतल्या आयएनएस कुंजली- 2 या नेवल एअरस्टेशनचं आयएनएस शिक्रा असं नवीन नाव देऊन अधिकृत कमांड देण्यात आली आहे. या आधी हे नेवल एअर स्टेशन अधिकृत नव्हतं. 26 ला मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर या एअर स्टेशनचं महत्त्व लक्षात घेउन नेव्हीने हे पाऊल उचललं आहे. सकाळी मुंबईतल्या आयएनएस कुंजली 2 या नेव्हल एअर स्टेशनचे ऍडमिरल सुरेश मेहता यांनी अधिकृतरित्या नाव घोषित केलं. 26 च्या हल्ल्यानंतर एनएसजी कमांडोंच्या ऑपरेशन साठी या एअर स्टेशनने महत्त्वाची भूमिका बजावली होती. 26 च्या हल्ल्यात सागरी किना-यांची सुरक्षा करण्यात नेव्ही तसंच इतर सुरक्षा यंत्रणा कमी पडल्याचं त्यांनी कबूल केलं.

close