‘कॉलेजमध्ये निवडणुकीबाबत 2 ते 3 दिवसांत निर्णय’

July 18, 2013 11:34 PM0 commentsViews: 241

Image img_234642_rajeshtopeon3463_240x180.jpg18 जुलै : कॉलेजमध्ये पुन्हा एकदा निवडणुका सुरू होणार असे संकेत माहिती उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी दिले. कॉलेजमधल्या निवडणुकीबाबत येत्या 2 ते 3 दिवसात निर्णय घेणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. यासंदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत चर्चाही झाल्याचं त्यांनी म्हटलंय. राष्ट्रवादी विद्यार्थी परिषदेत त्यांनी ही माहिती दिलीय. दरम्यान, कॉलेज निवडणुकांचा प्रस्ताव आला तर विद्यार्थीनींना आरक्षण मिळालं पाहिजे असं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलंय. येत्या शैक्षणिक वर्षात या निवडणुका सुरु झाल्या पाहिजेत असं मतही अजित पवार यांनी मांडलंय. मागिल आठवड्यात कॉलेजमध्ये पुन्हा एकदा निवडणुका घेण्याबाबत हालचाल सुरू केली होती. याबाबत सरकारकडे वेगवेगळ्या विद्यार्थी संघटनांकडून मागणीचा प्रस्तावही आला. मात्र हा निर्णय घ्यावा की नाही याबाबत सरकारने कोणतीही ठोस भूमिका घेतली नव्हती. आता मात्र निवडणुकींचा मार्ग मोकळा होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कॉलेजमध्ये निवडणुकींचा आखाडा रंगणार हे निश्चित.

close