डान्सबार सुरु होण्यास विधी-न्याय खातंच जबाबदार’

July 18, 2013 8:11 PM1 commentViews: 446

18 जुलै : राज्य सरकारने आठ वर्षांपूर्वी डान्सबार बंदीचा घेतलेला निर्णय मोडीत निघाला. सुप्रीम कोर्टाने मुंबईसह राज्यातील डान्सबारवरील बंदी उठवलीय. हा निर्णय म्हणजे राज्य सरकारचं अपयश आहे अशी टीकाच विरोधकांनी केली. मात्र डान्सबारची बंदी उठायला विधी आणि न्याय खात्यातल्या त्रुटी जबाबदार आहे अशी टीका करत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काँग्रेसवर हल्लाबोल केलाय.विधी व न्याय खातं मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित येतं. त्यामुळे अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधालाय. दरम्यान, सत्ताधार्‍यांच्या आरोपबाजींवर विरोधकांनी टीका केलीय. हे सरकार आहे की सर्कस आहे असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलाय.

  • drkamlakar bagal

    Boss don’t hide the truth you government discriminate the common people’s entertainment to the ultra rich who can enjoy the dance in three star and five star hotels. The constitution of India gives equal right to all the people.

close