बंद पडलेल्या बीअर बारमध्ये भरते शाळा !

July 18, 2013 7:36 PM0 commentsViews: 417

18 जुलै : बारामती तालुक्यातल्या डोर्लेवाडीमध्ये इंग्रजी माध्यमाची अनधिकृत शाळा चक्क बंद पडलेल्या बीअर बारमध्ये भरतेय. कोणत्याही भौतिक सुविधा नसताना ही शाळा गेल्या तीन वर्षांपासून चालू आहे. राज्यातल्या अनधिकृत शाळा जुनपुर्वीच बंद करण्याचे आदेश असताना आजही अनेक शाळा बेकायदेशीररित्या सुरू आहेत. बारामती तालुक्याच्या सभापती प्रतिभा नेवसे यांच्याच डोर्लेवाडी या गावात प्रज्ञेश इंग्लिश मीडियम स्कूल ही शाळा वर्ग खोल्या, शौचालय, ग्राऊंड अशा कुठल्याही सुविधा नसताना सुरु आहे. महत्वाचं म्हणजे शाळेतून
चौथी पास झालेल्या विद्यार्थ्यांना पुढच्या प्रवेशासाठी एका बंद पडलेल्या शाळेचे दाखले देण्यात येत आहेत. पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षण अधिकार्‍यांनी ही शाळ बंद करण्याचे आदेश देऊन सुद्धा कोणतीही ठोस कारवाई होत नाही. शाळा सुरु होण्यापूर्वी आपल्याला कोणतीही पूर्व सुचना देण्यात आली नव्हती, अशी भूमिका संस्थाचालक महादेव काळे यांनी घेतलीय.

close