मनसेची तोडफोड – 25 कोटींची भरपाई

January 23, 2009 6:50 AM0 commentsViews: 2

23 डिसेंबर, औरंगाबादसंजय वरकड औरंगाबदच्या वाळूज औद्योगिक वसाहतीतल्या तोडीफोड प्रकरणी मनसेला 25 कोटींची नुकसान भरपाई करावी लागणार आहे. वाळूज औद्योगिक वसाहतीत व्हेरॉक आणि ड्युरोवॉल्स या दोन कंपन्याची तोडफोड झाली होती. ही तोडफोड कर्मचारी कपात केल्यानं मनसेनं केली होती. त्यामुळे कंपनीचं नुकसान झालं होतं. ही नुकसान भरपाई मनसेनेकडून घेण्याची कारवाई पोलिसांनी सुरू केली आहे. अशाप्रकारे वसुली करण्याची ही राज्यातील पहिलीच घटना आहे वाळूज औद्योगिक वसाहतीत कामगार आणि व्यवस्थापनाच्या वादातून बुधवारी व्हेरॉक इंजिनिअरिंग आणि ड्युरोवॉल्स कंपनीत मनसेप्रणित कामगार संघटनेनं यंत्रसामग्रीवर हल्ला चढविला. त्यात कार्यालय आणि यंत्रांचं पंचवीस कोटींहून अधिक नुकसान झालंय. पोलिसांनी आता मनसेकडून वसुली करण्याचा निर्णय घेतलाय तर मनसेनं आंदोलन सुरूच ठेवणार असं जाहीर केलंय.दरम्यान व्हेरॉक व ड्युरोवॉलमध्ये कामगार कायद्याचं पालन केलं जात नाही, म्हणून या दोन्ही कंपन्यांच्या व्यवस्थापनाविरूध्द फौजदारी खटले दाखल करण्यात आलेत.याप्रकरणात आतापर्यंत एकशे बासष्ट कामगारांना अटक झालीय.

close