अवघे गर्जे पंढरपूर..!!

July 18, 2013 11:21 PM0 commentsViews: 793

18 जुलै :अवघे गर्जे पंढरपूर….विठ्ठल नामाचा गजर करत लाखो वारकरी आपल्या विठूरायाच्या दर्शनासाठी आणि आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरपुरात दाखल झाले आहेत. विठूरायाच्या भेटीसाठी एकोणीस दिवसांची वारी करुन राज्यभरातले भाविक पंढरपुरात दाखल झाले. अवघी पंढरीनगरी हरिनामाच्या गजरानं दुमदुमलीय. प्रत्येक रस्त्यावर वारकर्‍यांची अलोट गर्दी पाहायला मिळतेय. चंद्रभागेच्या तीरावर तर वैष्णवांचा महासागर लोटलाय. भाविकांसाठी तीन वेगवेगळ्या पद्धतीने दर्शनाची सुविधा उपलब्ध करण्यात आलीय. त्यात मुखदर्शन, पदस्पर्श दर्शन आणि ऑनलाईन दर्शन यानुसार मुखदर्शनासाठी सध्या 8 तासांचा कालावधी लागतोय. पदस्पर्श दर्शनासाठी 19 तासांचा वेळ लागतोय. तर ऑनलाइन दर्शनासाठी 2 तासांचा कालावधी लागतोय. गुरूवारी संध्याकाळी सर्व प्रमुख संतांच्या पालख्या पंढरीत दाखल झाल्या आहेत. त्यामुळे पंढरपूरचं वातावरण अवघा रंग एक झाला…रंगी रंगला श्रीरंग असं होऊन गेला आहे.

close