उद्धव ठाकरे दिल्ली दौर्‍यावर

July 18, 2013 11:39 PM0 commentsViews: 168

Image udhav_on_karnatak_election_300x255.jpg18 जुलै : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पुढचे दोन दिवस दिल्लीच्या दौर्‍यावर आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच दिल्लीला गेलेत. ते उद्या भाजपच्या विविध नेत्यांची भेट घेणार आहे. त्याचबरोबर जनता दल यूनायटेडच्या शरद यादव यांचीही ते भेट घेण्याची शक्यता आहे. जेडीयू एनडीएतून बाहेर पडल्यानंतर एनडीएचं निमंत्रक पद रिकामं आहे. या पदाबद्दल भाजपच्या नेत्यांकडून उद्धव ठाकरेंशी काही चर्चा केली जाते का, हे बघावं लागेल. याशिवाय ते आणखी कोणकोणत्या नेत्यांना भेटातात, याबद्दलही उत्सुकता आहे.

close