‘देशाचं नेतृत्त्व करू शकेल, असा एकही नेता नाही ‘

July 19, 2013 5:01 PM2 commentsViews: 1003

udhav on sharad pawar_219 जुलै : आज देशासाठी एक मजबूत सरकारची गरज आहे आणि देशासाठी एका नेतृत्त्वाची गरज आहे पण हे नेतृत्त्व करण्यासाठी एकही असा चेहरा नाही जो देशाचं नेतृत्त्व करू शकेल. हा माझ्या देशाचा नेता आहे असं म्हटलं तर कुणीच समोर येणार नाही अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदींसह काँग्रेसच्या नेत्यांना टोला लगावला. ते दिल्लीत बोलत होते. विशेष म्हणजे मागिल महिन्यात शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून नरेंद्र मोदींवर टीका करण्यात आली होती. मात्र त्याच दिवशी उद्धव यांनी पत्रकार परिषद घेऊन सारवासारव केली आणि मोदींचं तोंड भरुन कौतुक केलं होतं.
“देश मोठा आहे. मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असले तरी त्यांची नियुक्ती आता राष्ट्रीय कार्यासाठी झाली आहे. मोदी यांनी उत्तराखंडात जाऊन गुजराती भाविकांना वाचविले असे सांगणे बरोबर नाही. या कामाबद्दल गुजरात सरकार व मुख्यमंत्र्यांचे स्वागत करावे तेवढे थोडेच. पण देशाचे संभाव्य उमेदवार म्हणून निवड होत असताना मोदी यांनी फक्त गुजरात एके गुजरात करावे व आपण फक्त गुजरात राज्यातील जनतेच्या सुख-दु:खाचा विचार करतो अशी भूमिका घ्यावी हे मारक आहे.

 

आपत्तीच्या प्रसंगी संकुचित किंवा प्रादेशिक नव्हे तर राष्ट्रीय विचार करणे आवश्यक आहे” अशा शब्दात शिवसेनेनं नरेंद्र मोदींच्या पराक्रमाचा समाचार ‘सामना’च्या अग्रलेखातून मागिल महिन्यात घेतला होता. पण सकाळी टीका केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन सारवासारव केली. एकीकडे एनडीएतून पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींची चर्चा सुरू आहे. त्यातच उद्धव ठाकरे यांनी आज देशासाठी एका नेतृत्त्वाची गरज आहे पण हे नेतृत्त्व करण्यासाठी एकही असा चेहरा नाही जो देशाचं नेतृत्त्व करू शकेल असं म्हटलं आहे. त्यामुळे उद्धव यांच्या विधानाला वेगळं महत्त्वप्राप्त झालंय.

 

  • Kalpana Charudatta

    सतत हाणामारी, लोकांच्या भावना भडकावणे, “नाहीतर मग बघाच” अशा धमक्या देणे म्हणजे नेतृत्व असेल तर खरोखातच या नेतृत्वाने देश चालणार नाही. आत्ताचे सरकार देश चालवायला मजबूत आहे. त्याला शातपणे देश चालवण्याचेच काम करू द्यावे.

  • Ravindra

    kalpanaji…….ha desh chalalay….pan kuthe …..mage…..apan support kelyamule……kiti bhrashatchar….mahagai…etc….

close