‘…तर निलंबित आमदारांचा अहवाल जनतेमध्ये जाहीर करू’

July 19, 2013 2:15 PM0 commentsViews: 417

girish bapat19 जुलै : विधानसभेत आमदारांनी पोलीस अधिकार्‍याला केलेल्या मारहाण प्रकरणाचा चौकशी अहवाल अजून सभागृहात सादर करण्यात आलेला नाही. त्यामुळे सभागृह अध्यक्षांनी हा अहवाल सभागृहाच्या पटलावर मांडला नाही तर अहवाल मागे घेऊन तो जनतेसमोर खुला करू असं आमदार गिरीश बापट यांनी स्पष्ट केलंय. गिरीश बापट हे स्वत: या चौकशी समितीचे सदस्य आहेत. आमच्या आजचा सवाल या कार्यक्रमात बापट यांनी हे स्पष्ट केलंय.

 

 

बुधवारी विरोधक एकनाथ खडसे यांच्यासह अन्य नेत्यांनी पीएसआय सचिन सूर्यंवशी मारहाण प्रकरणातील आमदारांचं निलंबन रद्द करण्यात यावं अशी मागणी केली होती. या मागणीसाठी विरोधकांनी विधानसभेत 10 मिनिटं गदारोळ घातला. पण विरोधी आमदारांनी सत्ताधारी पक्षाशी चर्चा करुन तीन आमदारांच्या निलंबनाच्या प्रश्नावर चर्चा करावी आणि यातून तोडगा काढावा अशी सूचना विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी केली होती. वसईचे आमदार क्षितीज ठाकूर आणि मनसेचे आमदार राम कदम यांनी पीएसआय सचिन सूर्यवंशी यांना विधानभवनाच्या आवारात मारहाण केली होती. या प्रकरणी राम कदम आणि क्षितीज ठाकूर यांना अटक करण्यात आली होती तसंच त्यांना तीन दिवसांचा तुरुंगवास भोगावा लागला होता.

 

close