मुंबईतल्या भटक्या कुत्र्यांवरचं संकट टळलं

January 23, 2009 10:51 AM0 commentsViews: 2

23 जानेवारी, मुंबई मुंबईतल्या भटक्या कुत्र्यांवरचं संकट काही काळापुरतं तरी टळलंय.भटक्या कुत्र्यांना मारण्याच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिलीय. भटक्या कुत्र्यांची संख्या वाढल्यानं नागरिकांना त्याचा त्रास होत होता. त्रासदायक कुत्र्यांना मारून टाकण्यात यावं अशी मागणी मुंबई हायकोर्टात करण्यात आली होती. हायकोर्टानं पालिकेला तसे आदेशही दिले होते. पण काही प्राणी मित्र संघटनांनी याच्या विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली. आणि आज सुप्रीम कोर्टानं या निर्णयाला स्थगिती दिलीय.

close