सलमानचा 24 जुलैला फैसला

July 19, 2013 3:58 PM0 commentsViews: 251

Image img_233792_salmankhanrajastan_240x180.jpg19 जुलै : 2002 हिट अँन्ड रन प्रकरणी अभिनेता सलमान खान आज मुंबई सेशन्स कोर्टात हजर झाला. या खटल्यातली पुढची सुनावणी 24 जुलै होणार आहे आणि यावेळा सलमानने स्वत: हजर रहावं असे आदेश कोर्टाने दिले. या प्रकरणी सलमान खानवर आयपीसी 304 ( 2) या कलमानुसार सदोष मनुष्यवधाचा खटला दाखल करण्यात आला आहे. 2002 साली सलमाननं भरधाव गाडी चालवून झालेल्या अपघातात एक जण ठार तर तीन जखमी झाले होते. याप्रकरणी त्याच्यावरती रॅश ड्रायव्हींग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र यावेळी 304 (2) नुसार सदोष मनुष्यवधाचा आरोप ठेवण्यात आला नव्हता. काही महिन्यांपूर्वी वांद्र्याच्या संबंधित कोर्टाने सलमान खानचा खटला सेशन्स कोर्टात वर्ग केला होता. त्याला सलमान खाननं आव्हान दिलं होतं. मात्र सलमानचा अर्ज कोर्टानं फेटाळून लावला आता या निकालाची सुनावणी आता 24 जुलैला होणार आहे.

close