भरत शहाला ट्रांझिट बेल

January 23, 2009 10:55 AM0 commentsViews: 4

23 जानेवारी, मुंबई सुधाकर कांबळे हिरे व्यापारी आणि फिल्म फायनान्सर भरत शहा याला, 2 फेब्रुवारीपर्यंत ट्रांझिट बेल देण्यात आली आहे. मुंबईतील मलबार हिल पोलिसांनी काल भरत शहाला अटक केली होती. भरत शहाच्या विरोधात गुजरातमधील वलसाड येथे गुन्हा दाखल आहे. भरत शहावर आयपीसी 420 आणि 406च्या अंतर्गत भरत शहावर फसवणूक करणे आणि विश्वासघात करणे हे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भरत शहानं गुजरातमधल्या बँकेतून 1 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. ते कर्ज त्यानं फेडलं नव्हतं. त्यामुळे गुजरात कोर्टानं भरत शहावर गुन्हा दाखल केला होता. भरतशहावर कारवाई झालेली आहे. भरत शहासारख्या व्यक्तीला अटक होणं गरजेचं होतं. कारण त्यानं सरकारी बँकेला फसवलं होतं. तो गुरुवारपासून पोलिसांच्या ताब्यात होता. जामिनासाठी त्यानं बरेच प्रयत्न केले. पण सेशन कोर्टानं त्याचे जामीन नाकारलेयत. जेव्हा त्यानं शुक्रवारी सकाळी कोर्टात जमिनासाठी अर्ज केला तेव्हा त्याला 2 फेब्रुवारीपर्यंत ट्रांझिट बेल मिळाली आहे.

close