नागपूर विद्यापीठात अभाविपच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ

July 19, 2013 6:20 PM0 commentsViews: 98

19 जुलै : नागपूर विद्यापीठात अभाविपच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातलाय. विद्यापीठाच्या अनेक कॉलेजेसमध्ये पूर्णवेळ शिक्षक नाहीत. शिक्षक नसलेल्या अशा 250 कॉलेजेसमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश बंदी होती. पण काही दिवसांपूर्वी ही प्रवेशबंदी उठवण्यात आली आहे. शिक्षक नसलेल्या कॉलेजेसमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ नये तसंच या कॉलेजेसची यादी जाहीर करावी या मागण्या करत अभाविपच्या कार्यकर्त्यांनी आज विद्यापीठात जोरदार निदर्शनं केलीय. यावेळेस या कार्यकर्त्यांनी दीक्षांत सभागृहाच्या खिडक्यांच्या काचाही फोडल्या.

close